मुंबई । अभिनेत्री कंगना रणौत आणि दिलजीत दोसांज यांच्यातील ट्विटर वॉरला दोन दिवस झाले. कंगनाने एका वयोवृद्ध शेतकरी महिलेबाबतची एक फेक न्यूज ट्विटरवर पोस्ट केली होती. शिवाय या ट्विटमध्ये कंगनाने सदर महिला ही १०० रूपयात प्रोटेस्टसाठी अव्हेलेबल होते, असा दावा केला होता. मात्र, तिच्या ट्विटमध्ये तिने केलेला दावा फोल ठरल्यावर तिने ते ट्विट डिलीट केले. यावर बॉलीवूड अभिनेता आणि लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांजने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. यामुळे चर्चेत आलेल्या दिलजीत दोसांजचे ट्विटरवर ४ लाख फॉलोअर्स वाढले आहेत.
कंगनाने शेतकरी आंदोलकांसाठी अपशब्द आणि भ्रम फैलावणारे ट्विट करताच दिलजीतने संताप व्यक्त केला होता. त्यावर कंगनाने त्यालाही अपशब्द वापरत उत्तर दिलं होतं. कंगनाने त्याच्यासाठी ट्विटमध्ये करण ‘जोहर के पालतू’ आणि ‘चमचा’ असे शब्द वापरले होते. यानंतर पंजाबी भाषेत दिलजीतने कंगनाचा चांगलाच पानउतारा केला होता. यावर अनेक सेलिब्रिटी दिलजीतच्या सपोर्टमध्ये आले होते. दिलजीतला सपोर्ट देण्यासाठी अनेक लोक पंजाबीमध्ये ट्विट करत होते.
रिपोर्टनुसार, या वादानंतर दिलजीतचे ४ लाख फॉलोअर्स वाढले आहेत. दिलजीतचे आता ४.३ मिलियन फॉलोअर्स आहेत. दिलजीतच्या फॉलोअर्सची संख्या बुधवारी अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहेत. दरम्यान कंगना विरोधात लीगल केसही फाइल करण्यात आली आहे. शेतकरी महिलेचा अपमान करण्यावरून ही केस फाइल करण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’