हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता नवाजुद्द्दीन सिद्दिकी म्हणजे एक अष्टपैलू अभिनेता. त्यांनी आपल्या अभिनय शैलीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली एक अनोखी आणि खास ओळख निर्माण केली आहे. मात्र नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास वाटतो तितका नक्कीच सोप्पा नव्हता. आज नवाजुद्दीन आपला ४७वा वाढदिवस साजरा करीत आहेत. अनेक चाहते मोठ्या संख्येने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र या आधी त्यांचा वाढदिवस असा एखाद्या सणासारखा नव्हता. एकेकाळी वॉचमन म्हणून काम करताना वाढदिवस साजरा करणे हि त्यांच्यालेखी कधीच प्राधान्य देण्यासारखी बाब नव्हती. पण आजचा दिवस त्या दिवसांहून खूप वेगळा आहे.
https://www.instagram.com/p/CJAzSnoBr7_/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील भुवना या लहानश्या गावी झाला होता. ते एका शेतकरी कुटुंबाचा भाग आहेत. त्यांचे वडील शेती करायचे. त्यामुळे घरची परिस्थिती म्हणावी तितकी श्रेष्ठ अशी नव्हती. यामुळे नवाजुद्दीन चित्रपटांत येण्यापूर्वी एके ठिकाणी वॉचमन म्हणून नोकरी करत होते आणि आपल्या कुटुंबियांना आर्थिक हातभार लावत होते.
https://www.instagram.com/p/CM1_PpehSPv/?utm_source=ig_web_copy_link
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन त्यांनी अभिमान वाटावा इतके यश आज संपादन केले आहे. त्यांना बालपणापासून चित्रपटांची आवड होती. मात्र फक्त ईद, दिवाळी अशा सणांच्या वेळीच त्यांना चित्रपट पाहायची संधी मिळत असे. त्यासाठीसुद्धा आधी त्यांना पैसा जमा करावा लागत असे आणि मग हे चित्रपट पाहता येत होते. चित्रपट पाहण्यासाठी त्यांना गावातून बाहेर शहरापर्यंत प्रवास करावा लागत असे.
https://www.instagram.com/p/CG6r8X9BGq3/?utm_source=ig_web_copy_link
नवाजुद्दीन सिद्दिकीने मुजफ्फरनगर मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर छोट्या मोठ्या नाटकांत त्यांनी काम करायला सुरुवात केली. काही नाटकांत काम केल्यानंतर त्यांना आपसूकच अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांना आपण अभिनय क्षेत्रात काहीतरी करावे असे वाटू लागले. यासाठी त्यांनी दिल्लीतील ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ मध्ये प्रवेश घेऊन अभिनय क्षेत्राशी संबंधित शिक्षण पूर्ण केले.
https://www.instagram.com/p/B9tkxRyBXtu/?utm_source=ig_web_copy_link
पुढे त्यांची गाडी थेट मुंबईकडे रवाना झाली. मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांचा संघर्ष आणखी खडतर झाला. कित्येक लोकांनी त्यांचा सावळा वर्ण आणि सर्वसाधारण अंगकाठी पाहून त्यांना चित्रपटात घेणे नाकारले.अनेक नाकारानंतर त्यांनी काही चित्रपट मिळाले. मात्र पदरी पडलेल्या चित्रपटांत त्यांना मोजून एक किंवा दोन सीन मिळाले. त्यांचा हा नकार पचवीत मिळतील ती लहान मोठी कामे करण्याचा इंडस्ट्रीतील प्रवेश तब्बल ५ वर्ष कायम होता.
https://www.instagram.com/p/B5UNJmuhGrX/?utm_source=ig_web_copy_link
मात्र त्यांनी काही हार मानली नाही. या बऱ्याच काळाच्या संघर्षानंतर आणि संयमित प्रतीक्षेनंतर अनुराग कश्यपने त्यांना आपल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटासाठी निवडले. या चित्रपटातून त्यांचा अभिनय खऱ्या अर्थाने उठून आला. त्यानंतर नवाजुद्दीन यांनी सरफरोश, पिपली लाइव, किक, बजरंगी भाईजान अशा अनेक चित्रपटात उत्कृष्ट दर्जाच्या भूमिका निभावल्या आहेत.