कॅटरीना आणि सलमान ‘भारत” चित्रपटात दिसणार एकत्र

Thumbnail 1533303182939
Thumbnail 1533303182939
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री (Bollywood actress) कॅटरीना कैफ आणि अभिनेता सलमान खान आगामी ‘भारत’ या चित्रपटामधे एकत्र दिसणार आहेत. प्रियांका चोप्राने भारत मधून काही कारणांमुळे माघार घेतल्याने आता तिच्या जागी कोण भुमिका करणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. आता त्या रोल साठी कॅटरिनाचे नाव फायनल झाले असून सलमान आणि कॅटरिना भारत च्या निमित्ताने पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

मागे सलमान खान ने फेसबुकवर कॅटरीनाचा उल्लेख सुशील कन्या असा केला होता. आता कॅटरीना ने भारत ची आॅफर कसलाही इगो मनात न बाळगता लगेच स्विकारल्याने सल्लु आणि कॅट यांच्या नात्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमधे वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभूमीवर ‘अली आब्बास जफर’ माझे चांगले मित्र आहेत, त्यांचे यापूर्वीचे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. त्यामुळेच मी भारत साठी होकार दर्शवला आहे असे कॅटरीना कैफ ने म्हटले आहे.