हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood अभिनेत्री Nushrratt Bharuccha हीचा आज वाढदिवस आहे. ती 37 वर्षांची झाली आहे. नुसरतने आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका केल्या आहेत. मात्र तिच्याविषयीची एक गोष्ट तुम्हांला माहिती आहे का ? आज फेमस असलेल्या या अभिनेत्रीला एकेकाळी ऑस्कर विनर चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र आपल्या सौंदर्यामुळे तिची ही संधी हुकली.
2011 मध्ये आलेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाद्वारे Nushrratt Bharuccha प्रसिद्धीच्या झोतात आली. यानंतर आलेल्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ने देखील बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली. आता नुसरत अनेक निर्मात्यांची पसंती बनत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने एक खुलासा केला आहे. यावेळी तिने सांगितले की, ती ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाचा भाग बनणार होती, मात्र तिला रिजेक्ट करण्यात आले. Bollywood
या मुलाखतीत Nushrratt Bharuccha ने सांगितले की, आपल्या सुंदर दिसण्यामुळे तिला या चित्रपटातून रिजेक्ट करण्यात आले. नुसरतने पुढे सांगितले की, या चित्रपटाच्या निर्मात्यांना तिचा अभिनय खूप आवडला होता. मात्र चित्रपटातील पात्र हे एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलीचं होतं आणि नुसरत खूपच सुंदर दिसत असल्यामुळे तिला ही भूमिका नाकारण्यात आली. पुढे जाऊन ही भूमिका अभिनेत्री फ्रीडा पिंटोला मिळाली. या चित्रपटाने नंतर ऑस्कर पुरस्कारही जिंकला होता. Bollywood
Nushrratt Bharuccha च्या कामा बाबत बोलायचे झाले तर ती 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोरी’ चित्रपटात दिसली होती. हा स्त्री भ्रूण हत्येवर आधारित हॉरर चित्रपट होता. नुकताच तिच्या ‘जनहित में जरी’ चित्रपटाचा ट्रेलर देखील समोर आला आहे. यामध्ये ती एका कंडोम विक्रेत्याची भूमिका साकारत आहे. या शिवाय ती ‘सेल्फी’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटामध्येही दिसणार आहे. Bollywood
हे पण वाचा :
आपल्या युझर्ससाठी WhatsApp लवकरच घेऊन येत ‘हे’ नवीन फीचर्स !!!
Fixed Deposits : आता ‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD वरील व्याजदर, नवीन दर तपासा
Apple, Google App Store वरून 15 लाखांहून जास्त Apps हटवले जाणार ???
Health : शरीराच्या कोणत्या भागाकडून सर्वाधिक ऊर्जा वापरली जाते???
Tax Saving : डोनेशन दिल्यानंतर वाचवता येईल टॅक्स??? कसे ते समजून घ्या