हॅपी बर्थडे शिल्पा शेट्टी..! वयाच्या चाळिशीनंतरही दिसते हॉट आणि ग्लॅमरस; जाणून घ्या शिल्पाचे रहस्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतावर सुपर से उपरवाला इफेक्ट असणारी लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच आज ४६वा वाढदिवस आहे. वयाची चाळीशी ओलांडली मात्र शिल्पा आजही तितकीच टवटवीत आणि ग्लॅमरस दिसते. अनेकांना तिच्या सौदर्यांबाबत अनेक प्रश्न पडत असतात याच साधं सहज उत्तर आहे योगा.

https://www.instagram.com/p/CO5OErEh-9b/?utm_source=ig_web_copy_link

८ जून १९७५ रोजी मंगरूळ कर्नाटकात शिल्पाचा जन्म झाला. मात्र बालपण आणि शिक्षण दोन्ही मुंबईतच झाले. शिल्पाने शालेय शिक्षण पूर्ण होताच मॉडेलिंगला सुरुवात केली. तिने लिम्कासाठी टीव्हीवर पहिली जाहिरात केली आणि त्यानंतर शिल्पाने सिनेसृष्टी काबीज केली.

https://www.instagram.com/p/COZi_XHha7x/?utm_source=ig_web_copy_link

आपल्या सुंदरतेशिवाय उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने आपला चाहता वर्ग बनविला. शिल्पा नेहमीच योगा लवर राहिली आहे. नुसती लवर नव्हे तर ती एक उत्तम योग ट्रेनरदेखील आहे आणि ती स्वतः दररोज योगाभ्यास करते. हेच काय ते तिच्या सौन्दर्याचे आणि टवटवीत चेहऱ्याचे गुपित.

https://www.instagram.com/p/CPs3MnvhE1j/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या अनेक वर्षांपासून शिल्पा योगा करत आहे. खरतरं त्यामुळेच शिल्पा अतिशय फिट अँड फाईन असून अजूनही मोहक दिसते. अनेकजण तिच्या याच फिटनेसचे चाहते आहेत. ती नियमित योगा करते. तसेच इतरांनाही फिट राहण्याचा सल्ला हमखास देते.

https://www.instagram.com/p/CN1hToFBbJI/?utm_source=ig_web_copy_link

इतकेच नव्हे तर शिल्पाला कुकींगचीदेखील आवड आहे. मुख्य म्हणजे शिल्पा तिचा एक कुकींग शो देखिल सोशल मीडियावर पोस्ट करते.

https://www.instagram.com/p/CMonJvIBcaz/?utm_source=ig_web_copy_link

याचसोबत शिल्पा एक बिजनेस वुमन देखील आहे. काही वर्ष ती राजस्थान रॉयल्स या आयपीएल टीमची मालकदेखील होती. तिने टीमचा को ओव्हनर राज कुंद्रा याच्याशी २००९ मध्ये विवाह केला. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. म्हणजे शिल्पा एक मॉडेल, अभिनेत्री, योग ट्रेनर, पत्नी आणि एक उत्तम आईसुद्धा आहे.

https://www.instagram.com/p/CLMT-fNhK9j/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ९०च्या काळापासून बॉलिवूड जगतावर राज्य करत आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच पण त्याचसोबत ती एक शिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. १९९३ मध्ये शिल्पाने पहिल्या चित्रपटात केले. बाजीगर या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यासोबत ती सहाय्यक भूमिकेत झळकली होती.

https://www.instagram.com/p/CJAiX-5heHC/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर शिल्पाने अनेक एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपट दिले. ‘मै खिलाडी तु अनाडी’, ‘इन्साफ’, ‘जमीर’, ‘धडकन’ असे अनेक सुपरहीट चित्रपट शिल्पाच्या नावावर आहेत. यातील धडकन चित्रपटाची गाणी तर एव्हर ग्रीन आहेत. शिवाय शिल्पाने काही चित्रपटांची निर्मिती देखिल केली आहे. बॉलिवूडमधील फार कमी लोकांकडे स्वतःच प्रायव्हेट जेट आहे आणि त्यातील एक शिल्पा देखील आहे.

Leave a Comment