रामगोपाल वर्मांचा ‘हॅपी- अनहॅपी मदर्स डे’!; शुभेच्छांच्या आड मोदींची केली टिंगल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल संपूर्ण जगात जागतिक मातृदिन साजरा केला गेला. अनेक दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या आईंसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. तसेच आपल्या चाहत्यांना मदर्स डेच्या निमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्या. यादरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मदर्स डे चे औचित्य साधत काही ट्विट केले. संपूर्ण जग हॅपी मदर्स डे म्हणत असताना राम गोपाल वर्मा यांनी स्वतःच्याच आईला ‘अनहॅपी मदर्स डे’ लिहीत शुभेच्छा देणे टाळले. तर डास, माकड, झुरळ आणि कोविडसह मोदींची तुलना करीत शुभेच्छांच्या आड टिंगल केली आहे.

रामगोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि,… असो, मी सर्व आईंना मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा देतो, मग ते मानव असोत किंवा डास, माकडे किंवा झुरळे किंवा कोविड किंवा नरेंद्र मोदी. या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्टपणे मोदींचे नाव घेत इतर कीटकांसहित , कोविड सारख्या भयानक महामारीसह त्यांची तुलना केली आहे. त्यांच्या या ट्विटवर नेटकरी उत्साही होत विविध प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहे. यातील अनेक नेटकरी रामगोपाल वर्मांच्या या ट्विटचे समर्थन करीत आहेत.

याआधी रामगोपाल वर्मांनी मदर्स डेनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये लिहिलेले कि, ‘प्रत्येक आई मुलांना जन्म देते. पण मी फक्त त्याच माऊलींना शुभेच्छा देऊ इच्छितो, ज्यांनी क्वालिटी प्रॉडक्ट जन्मास घातले. माझ्यासारख्या बेकार माणसाला जन्म दिल्यामुळे माझ्या आईला मी अजिबात शुभेच्छा देणार नाही. मॉम, तुला खूप अनहॅपी मदर्स डे… कारण मी तुला आनंदाचा एक दिवसही देऊ शकलो नाही…’हे अश्या पद्धतीचे ट्विट वाचून कुणाला उत्साह आणि आनंद होणार आहे..? राम गोपाल वर्मा यांचे हे ट्विट वाचून साहजिकच कुणीही हैराणच होईल.

Leave a Comment