नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना फ्रीमध्ये पाहता येणार काही शो आणि मूव्हीज; जाहीर केली यादी

नवी दिल्ली । लोकप्रिय ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर Netflix मेंबरशिप नसल्यासही आता कंपनीकडून नेटफ्लिक्सचे काही शो आणि मूव्हीज प्रेक्षकांना मोफतमध्ये पाहता येणार आहेत. नेटफ्लिक्सने यासंदर्भात एक यादी जाहीर केली आहे, जी भारतासह संपूर्ण जगात विनामूल्य उपलब्ध होणार आहे. यूजर्सला netflix.com/in/watch-freeवर, यादीतील विनामूल्य शो किंवा मूव्ही पाहता येणार आहे. Netflixने दिलेल्या माहितीनुसार, यूजर्स कंम्प्यूटर आणि अँन्ड्ऱॉईड डिव्हाईसचा उपयोग करुन Netflixच्या ओरिजनल मूव्हीज, टीव्ही शो ऑनलाईन पाहू शकतील.

ओटीटी कंपनीकडून पहिल्यांदाच अशी ऑफर दिली गेली नसून, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही कंपनीने आपल्या काही ओरिजनल्सचे, पहिले एपिसोड भारतात विनामूल्य वापरण्याचा ऍक्सेस दिला होता. त्याशिवाय नेटफ्लिक्सकडून आपले काही शोज YouTubeवरही फ्रीमध्ये उपलब्ध केले जातात. नेटफ्लिक्सने सांगितलं की, ते ओरिजनल सीरिज, मूव्हीज फ्रीमध्ये पाहण्याची ऑफर देत आहेत, जेणेकरुन यूजर्स नेटफ्लिक्सचा अनुभव घेतील आणि पुढे मेंबरशिप घ्यायची की नाही ते ठरवू शकतील. कंपनीने नुकताच भारतात एक स्वस्त 349 रुपयांचा सब्स्क्रिप्शन प्लान टेस्ट केला होता. यात यूजर्सला हाय डेफिनिशन व्हिडिओ परवडणाऱ्या किंमतीत ऑफर केला जाऊ शकतो.

नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, स्ट्रेंजर थिंग्स (Stranger Things), मर्डर मिस्ट्री (Murder Mystery), एलिट (Élite), बॉस बेबीः बॅक इन बिजनेस (Boss Baby: Back in Business), बर्ड बॉक्स (Bird Box), व्हेन दे सी अस (When They See Us), लव इज ब्लाइंड (Love Is Blind), द टू पोप्स (The Two Popes), अवर प्लेनेट (Our Planet) आणि ग्रीक अँड फ्रेन्की (Grace and Frankie) यांसारखे शो यूजर्सला फ्रीमध्ये पाहता येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com