Monday, January 30, 2023

बॉलिवूड सिंगर मिका सिंगने उडवली ‘KRK’ची खिल्ली; ‘केआरके कुत्ता’ गाण्याची सोशल मीडियावर धूम

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वयंघोषित चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरके आपल्या वादग्रस्त टीका आणि वक्तव्यांमुळे चांगलाच चर्चेत असतो. तो नेहमीच आपल्या तल्लख बुद्धीचा नको तेवढा वापर करून देशातील विविध मुद्दे, राजकारणी आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबाबत मुक्ताफळ काढताना दिसतो. यावेळी त्याने गायक मिका सिंगची काळ काढली आणि ती देखील त्याच्या चांगलीच अंगाशी आली आहे. केआरकेच्या रिव्ह्यु देण्याच्या पद्धतीवर मिकाने संताप व्यक्त केला होताच. शिवाय त्याची खिल्ली उडवण्यासाठी त्याने ‘केआरके कुत्ता’ असे गाणे तयार केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर धूम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या दोघांचा वाद नक्कीच विकोपाला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.

- Advertisement -

केआरके विविध चित्रपटांचे समिक्षण करताना अनेकदा कलाकारांच्या वैयक्तिक बाबी वा खाजगी आयुष्याची खिल्ली उडवतो. यामुळे सलमानने त्याच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्याच्या या तक्रारीला बॉलिवूड गायक मिका सिंग याने समर्थन दिले होते.

मात्र मिकाचे समर्थन काही केआरकेला खपले नाही. यावर त्याने मिका सिंगला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याने मिकाला सलमान खानचा पाळीव कुत्रा असे संबोधत सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली. या प्रकारामुळे मीकाच्या संताप विकोपाला गेला आणि त्याने थेट ‘केआरके कुत्ता’ गाण्याची निर्मिती केली.

यानंतर ‘केआरके कुत्ता’ या गाण्याची केवळ घोषणा ऐकून केआरके अतिशय संतापला होता. त्याने मिकाला हे गाणे रिलिज करुन दाखवच असा धमकीवजा इशारा दिला होता. ‘इतकं भुंकतोस कशाला, हिंमत असेल तर गाणं रिलिज करुन दाखव मग तुला बघतो मी’ अशा आशयाचे ट्विट करुन त्याने मिकाला थेट आव्हाहनच दिले होते. हे म्हणजे असं झालं कि आ बैल मुझे मार. मग काय मिकाने मनावर घेत गाणे युट्यूबवर रिलिज केले आहे. यानंतर आता हे गाणे सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. अगदी काही तासांतच या गाण्याने १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत.