हॅपी बर्थडे नेहा कक्कर; नेहूच्या रोहूने केले रोमँटिक अंदाजात बर्थडे वीश, सोशल मीडियावर पोस्ट वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील आघाडीची सिंगर नेहा कक्करने आपल्या अनोख्या आवाजाने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली. आजकाल जवळ जवळ सगळ्याच चित्रपटात तिच्या आवाजातील किमान एक गाणे ऐकायला मिळतेच. तिच्या गाण्यांना चाहत्यांचीही खूप पसंती मिळते. अश्या या सुरेल नेहाचा आज ३३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोशल मीडियावर तिचा पती रोहनप्रीत सिंग याने तिला खास रोमँटिक अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. रोहनप्रीतची ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यांचे चाहते या पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

https://www.instagram.com/p/CPwx8GKng9G/?utm_source=ig_web_copy_link

ऑक्टोबर २०२० मध्ये नेहाने पंजाबी गायक रोहनप्रीतसह साताजन्माची गाठ बांधली. लग्नानंतर रोहन आणि नेहा अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन प्रेम व्यक्त करताना दिसतात. अशात आज नेहाचा आज वाढदिवस असल्याने रोहनला आणखी एक निमित्त मिळालं. मग काय पत्नीला रोमँटिक फोटोसोबत अप्रतिम कॅप्शन देत त्याने हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CPuSoIED7yn/?utm_source=ig_web_copy_link

त्यात कालच नेहाने आपला वाढदिवस असल्याची आठवण करून दिली होती, त्यामुळे नवऱ्याकडून असं वीश मिळणं स्वाभाविकच आहे ना.. रोहनने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात नेहा त्याच्या मिठीत दिसतेय. याच फोटोसोबत एक सुंदर अशी पोस्ट लिहीत रोहनने नेहाला कायम खुश ठेवण्याचे वचन दिले आहे.

https://www.instagram.com/p/CPAcnJvjEyN/?utm_source=ig_web_copy_link

यात त्याने लिहिले की ‘अरे माझ्या प्रेमाची माझी राणी नेहा कक्कर, आज तुझा वाढदिवस आहे. मला तुला सांगायचं आहे की मी आतापर्यंत तुझी जेवढी काळजी घेतली त्यापेक्षा जास्त काळजी घेईन. तू मला प्रत्येक दृष्टीने प्रेमळ वाटतेस. मी तुला वचन देतो की मी तुला प्रत्येक आनंद देईन.’ ‘ मला तुझा पती होण्याचा अभिमान वाटतो, मी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्यावर प्रेम करण्याचं वचन देतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, जेव्हा तू हे वाचशील तेव्हा हसत राहशील अशी आशा आहे, जेव्हा तू माझ्याकडे असते तेव्हा नेहमीच आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटते. तू सदैव माझी आहेस… देव तुला आशीर्वाद देवो… नेहू माझी राणी.’

Leave a Comment