रायगडमध्ये आढळली ‘ती’ बॉम्बसदृष्य वस्तू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रायगडमधील पेण शहरानजीक असलेल्या भोगावती नदीत तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संबंधित स्थानकांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास केला. मात्र, तो डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रायगडमधील भोगावती नदीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पाण्यावर तरंगती बॉम्बसदृष्य वस्तू काही स्थानिकांना आढळली. त्यानंतर स्थानिकांनी या बॉम्बसदृष्य वस्तूची पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने आढळलेल्या वस्तूच्या घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर यासंदर्भात माहिती रायगड बॉम्बशोधक पथकाला पोलिसांनी दिली. रायगड बॉम्बशोधक पथकाने या बॉम्बसदृष्य वस्तूचा तपास सुरू केला. तब्बल 4 तासाच्या तपासानंतर बॉम्ब निकामी असल्यात पथकाला यश आले. संबंधित या डमी बॉम्बमध्ये वायर आणि घड्याळाचाही वापर करण्यात आला होता.

या परिसरात आणखी काही संशयास्पद वस्तू आहे का? याबाबत पोलिसांकडून आज दिवसभर शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. दरम्यान, रायगडच्या भोगावती नदीत ही बॉम्बसदृष्य वस्तू आढळली कशी? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.