हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या सरकारी नोकरीच्या (Job Requirement) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. नुकतीच बॉम्बे हायकोर्टात (Bombay High Court) क्लर्क पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बॉम्बे हायकोर्टात एकूण 129 पदांसाठी ही भरती प्रकिया होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे जीसीसी-टिबीसी (GCC-TBC) किंवा आयटीआयकडून मिळालेले इंग्रजी टायपिंगचे 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा आणि वेतन
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली असून त्यांच्यासाठी कमाल वयाची अट 43 वर्षे आहे. यामध्ये हायकोर्ट किंवा इतर शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा नाही. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटला https://bombayhighcourt.nic.in भेट द्यावी. त्यानंतर “न्यूज अँड इव्हेंट्स” विभागातील “Applications are invited for the post of Clerk” या लिंकवर क्लिक करावे. येथे उमेदवारांना संपूर्ण जाहिरात, मार्गदर्शक सूचना आणि ऑनलाईन अर्जाचा पर्याय उपलब्ध आहे.
अर्ज करण्याची मुदत
लक्षात घ्या की, अर्ज प्रक्रिया 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे तातडीने इच्छूक उमेदवारांनी अर्ज भरावेत.




