“ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट” म्हणत पेट्रोल- डिझेल विरोधात बोंबाबोंब आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात युवक काँग्रेसचा वतीने महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ओ सेठ तुम्ही नादच केलाय थेट अशा घोषणा देत निषेध केला. युवक काॅंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले.

सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर येणाऱ्या नागरिकांकडून महागाई विरोधात स्वाक्षरी घेवून मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकासमोर हे आंदोलन करण्यात आले. मागील काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. राज्यात सर्वत्र काॅंग्रेसने महागाई विरोधात आंदोलन छेडले आहे. साताऱ्यातही युवक काॅंग्रेसने आंदोलन केले.

https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/4340386062650596

विराज शिंदे म्हणाले, काॅंग्रेसच्या काळात पेट्रोल दरवाढी विरोधात ओरडणारे आता गप्प सरकारमध्ये बसले आहेत. सामान्यांना अच्छे दिनची स्वप्ने दाखविली, त्याबदल्यात महागाई दिली असून कर आकारून लुटले आहे. सामान्य लोकांचा संसार कसा चालणार असा सवाल निर्माण झाला असून आम्ही युवक काॅंग्रेसच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करतो.