कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ मासेमारी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना आज एका पिशवीत ग्रेनेड जिवंत बॉम्ब सापडले आहेत. सदरचे बॉम्ब ऑर्डन्स फॅक्टरीतील (ODS) असून अत्यंत धोकादायक असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदी पुलाजवळ सोमवारी दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता तीन ग्रेनेड बॉम्ब सापडले आहेत. त्या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, कराडचे डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह बीडीएस (BDS) टीम उपस्थित होती. या ठिकाणी दोन किलोमीटर अंतरामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/518649259136309/
पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल म्हणाले, तांबवे गावाजवळील सापडलेला बॉम्ब अत्यंत धोकादायक असून येथे कसा आला हा आश्चर्याचा प्रश्न आहे. त्याचा तपास आम्ही करणार आहोत. हा बॉम्ब खूप जुना असून धोकादायक असल्याने बीडीएस टीम घटनास्थळी आली आहे. येथेच जाग्यावरती हे बॉम्ब निकामी करण्यात येणार आहेत. सदरचे बॉम्ब नक्षलवादी यांच्याकडे असतात, तसे देशी बनावटीचे नाहीत. पोलीस, आर्मी किंवा सीआरपीएफ यांच्यासाठी हे बॉम्ब दिले जातात. परंतु या ठिकाणी हे बॉम्ब कसे आले याचा तपास पुढील दोन ते तीन दिवसात केला जाईल. तसेच गुन्हाही दाखल केला जाईल.