Paytm च्या माध्यमातून झटक्यात बुक करा एलपीजी सिलेंडर, आतापर्यन्त 50 लाख लोकांनी केले बुकिंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी लोकं मोठ्या संख्येने पेटीएमचा वापर करत आहेत. एलपीजी बुकिंग सुविधा सुरू केल्याच्या एका वर्षातच 50 लाखाहून अधिक बुकिंग झाल्याचे या डिजिटल वित्तीय सेवा मंचात शुक्रवारी सांगितले. यासह, एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी पेटीएम आता देशातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म बनला आहे.

मागील वर्षी पेटीएम ने ‘Book a Cylinder’ सुविधा लॉन्च केली होती. यासाठी कंपनीने पहिले एचपी गॅस नंतर इंडियन ऑईलबरोबर आणि इंडेनबरोबर भागीदारी केली. यावर्षी मेमध्ये भारत गॅसबरोबर टायअपची घोषणाही करण्यात आली आहे. पेटीएमच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सोयीस्कर मार्गाने गॅस बुकिंग सुविधेमुळे मोठ्या संख्येने लोक या प्लॅटफॉर्मला महत्त्व देत आहेत.

हे प्लॅटफॉर्म कसे काम करते?
पेटीएम अ‍ॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना ‘Book a Cylinder’ या टॅबवर जावे लागेल. या टॅबमध्ये, त्यांना त्यांचा गॅस प्रोव्हायडर, LPG ID/मोबाइल नंबर/कंज्यूमर नंबर द्यावा लागेल. यानंतर त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यानंतर सर्वात जवळची एजन्सी ग्राहकांच्या घरी गॅस सिलेंडर डिलिव्हरी करते.

पेटीएमचे उपाध्यक्ष नरेंद्र यादव म्हणाले, ‘एलपीजी सिलेंडर ही देशातील सर्वात मोठी युटिलिटी कॅटेगरी पैकी एक आहे. सर्व सामाजिक-आर्थिक वर्ग आणि भौगोलिक भागातील लोक याच्या अंतर्गत येतात. ते आमच्यासाठी उच्च प्राथमिकतेच्या श्रेणीत येते. अत्यावश्यक सेवांचे डिजिटलायझेशन करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीही हा एक प्रमुख ड्रायव्हर आहे. आम्ही चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी 1 कोटी बुकिंगची संख्या पार करण्याच्या दिशेने काम करीत आहोत.

युटिलिटी बिले भरणे हा पेटीएमचा एक मुख्य भाग आहे, जिथे कंपनी बर्‍याच कॅटेगरी मध्ये मार्केट लीडर म्हणून उदयास आली आहे. यात वीज, पाइप्ड गॅस, पाणी इत्यादी युटिलिटी बिल्सचा समावेश आहे. आता कंपनी देशभरात आपल्या सेवा वाढविण्यावर भर देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.