DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । DBS Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता DBS Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

DBS Launches SMB Mobile Payment Acceptance Tool

18 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

DBS Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवर लागू होतील. 18 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. DBS Bank कडून सध्या 7 दिवसांच्या FD वर 2.50 टक्के, 8 दिवस ते 60 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के, 61 ते 180 दिवसांच्या FD वर 3.00%, 181 दिवस ते एक वर्षाच्या FD वर आता 4.75% दराने व्याज दिले जाईल. तसेच DBS Bank आता एक वर्ष ते 375 दिवसांच्या FD वर 6.00 % आणि 376 दिवस ते 540 दिवसांच्या FD वर 6.25% व्याज देईल. 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 541 दिवसांच्या FD वर, बँक 6.50 टक्के कमाल व्याज देईल. तर 3 वर्ष आणि त्याहून जास्त दिवसांच्या FD वर 6.25% व्याज मिळेल.

DBS India to hire 600-800 persons in 18 months as it goes into expansion mode | Mint

नवीन व्याज दर

याशिवाय आपल्याला FD चा कालावधी निवडता येईल. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वर 50 बेसिस पॉइंट्सचा प्राधान्य दर मिळेल. केवळ घरगुती ज्येष्ठ नागरिक विशेष दरासाठी पात्र आहेत. एनआरओ आणि एनआरई फिक्स्ड डिपॉझिट्ससाठी ज्येष्ठ नागरिकांना विशेष दर लाभ उपलब्ध नाहीत. मात्र,181 दिवस किंवा त्याहून जास्त कालावधीसाठी प्राधान्य दर प्रभावी असतील.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर