लंडन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता ते पूर्णपणे बरे झाले असून आपल्या या कठीण काळाबद्दल त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपले अनुभव व्यक्त केले आहेत. ‘कोरोनाचे उपचार सुरू असताना माझा मृत्यू ओढवू शकेल याचाही तयारी डॉक्टरांनी ठेवली होती. इतकी माझी अवस्था विकट झाली होती. पण, डॉक्टरांनी मला मृत्यूच्या दाढेतून अक्षरक्ष: खेचून बाहेर काढले. मी त्यांचा शतश: ऋणी आहे’,अशा भावूक शब्दांत ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रिटनचे ५५ वर्षीय पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जवळपास महिनाभर कोरोना झाल्यावर उपचार घेतल्यानंतर गेल्या आठवड्यात ते घरी परतले.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यांनतर ‘द सन ऑन संडे’ला दिलेल्या मुलाखतीत बोरिस जॉन्सन यांनी आपल्या कोरोनालढ्याविषयीची माहिती दिली आहे. ‘७ एप्रिलला मी सेंट थॉमस हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल झालो आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. ऑक्सिजनचा पुरवठा तर अव्याहत सुरू होता. कठीण काळ होता तो. मी नाकारत नाही. माझी प्रकृतीचं काही खरं वाटत नव्हतं आणि डॉक्टरही काही वाईट घटना घडण्याच्या दृष्टीने तयारीत होते. मला ते जाणवत होतं’, असे जॉन्सन मुलाखतीत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”