हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये PNB चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 5 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे.
PNB MCLR चे नवीन दर
1 डिसेंबरपासून PNB चे नवीन दर लागू झाले आहेत. ज्यानंतर आता ओव्हरनाइट MCLR 7.40% वरून 7.45%, 1-महिन्याचा MCLR 7.45% वरून 7.50%, 3-महिन्याचा MCLR 7.55% वरून 7.60%, 6 महिन्यांचा MCLR 7.75% वरून 7.80% तसेच 1 वर्षाचा MCLR 8.05% वरून 8.10% आणि 3 वर्षाचा MCLR 8.35% वरून 8.40% झाला आहे.
जास्त EMI द्यावा लागणार
मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये 5 बेसिस पॉईंट्सने वाढ झाल्यामुळे, ज्या ग्राहकांनी PNB कडून आधीच कर्ज घेतले आहे त्यांना आता जास्त EMI द्यावा लागणार आहे. तसेच आता नवीन कार लोनवरील एक वर्षाचा MCLR+0.10% सध्या 8.15% आहे आणि एक वर्षाच्या वापरलेल्या कार लोनसाठीचा MCLR+1.10% सध्या 9.15% आहे.
बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झाली घट
हे लक्षात घ्या कि, सप्टेंबर तिमाहीमध्ये PNB चा एकत्रित निव्वळ नफा 63 टक्क्यांनी घसरून 411 कोटी रुपयांवर आला आहे. निव्वळ नफ्यातील ही घट बुडित कर्जासाठी जास्त तरतूद केल्यामुळे झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत बँकेने 1,105 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. शेअर बाजाराला PNB ने सांगितले की,”चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत त्यांचे एकूण उत्पन्न 23,001.26 कोटी रुपये झाले आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत 21,262.32. बँकेचे व्याज उत्पन्न देखील दुसऱ्या तिमाहीत वाढून 20,154 कोटी रुपये झाले आहे जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 17,980 कोटी रुपये होते.
MCLR काय असते ???
MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत.
RBI ने रेपो दरात केली वाढ
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/mclr-rates.html
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर