मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडूनचं सोडवून घ्यावा – शरद पवार (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर । छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, माजी आमदार दीपक आबा साळुंखे उपस्थित होते.

मराठा आरक्षांवर विचारलेल्या विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, ”दोन्ही छत्रपती हे राज्यसभेत आहेत. हे दोघेही भाजपच्या मदतीने राज्यसभेत आले. उदयनराजेंची निवड भाजपने केली. आणि संभाजीराजेंनी निवड राष्ट्रपतींनी केली. ती ही पंतप्रधानांच्या सांगण्यावरून म्हणजेच नरेंद्र मोदींच्या. त्यामुळं आमच्या दृष्टीनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या पाठीशी केंद्रातील सत्ताधारी पक्ष आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवून घेण्यास मदत होईल. त्यामुळं दोन्ही छत्रपतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना एनडीएत सामील होण्याच्या सल्ल्यावर पवार म्हणाले,”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही.” असं टोला त्यांनी यावेळी लगावला. याशिवाय फडणवीस-राऊत भेटीबाबत पवार यांनी सांगितलं कि, ”खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. कृषी विधेयक येण्यापूर्वीही शेतकऱ्यांना त्यांचा मालक इतर ठिकाणी विक्री करता येत होता. कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे. सर्व मिळून या विधेयकाला विरोध करणार आहे मात्र याचा नेतृत्व कोणी एकटा न करता शेतकरी करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.