सातारा | सातारा (Satara) शहरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरील (Instagram) मैत्रीचे प्रेमात रूपांतर अन् अत्याचारातून सातवीतील 4 महिन्यांची मुलगी गरोदर (Pregnant) राहीली आहे. तर अत्याचार करणारा मुलगाही अल्पवयीन (Minor) आहे. या प्रकरणामुळे सोशल मिडियाचा गैरवापराचे एक उदाहरण समोर आले आहे. संबधित मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हाही आता दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी, पीडित मुलगी सातवीत शिकत आहे. सप्टेंबर 2022 दरम्यान या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. अल्पवयीन मुलाने मुलीला गोड बोलून तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकले. बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. पुढे मुलाच्या घरात कोणी नसल्याने त्याचा गैरफायदा घेवून त्याने अत्याचार केला.
वेळोवेळी अत्याचार झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुलीला पोटदुखी होवू लागली. अखेर पालकांनी मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर 4 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली. या घटनेने पालक कोलमडून गेले. मुलीला बोलते केल्यानंतर तिने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावरुन मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेतील पिडीत मुलीवर उपचार सुरु आहेत. संशयित मुलगा व मुलगी हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इंस्टाग्रामवरील या दोघांची मैत्री जमली होती.