तांबवे परिसरात चोरीच्या दुचाकी विकत असताना दोघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कराड तालुक्यातील तांबवे परिसरात येथे पुणे येथून चोरून आणलेल्या दुचाकी विकत असताना सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. यावेळी संशयितांकडून अडीच लाख रूपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. ताब्यात घेतलेले संशयितातील एकाचा दरोड्याचा गुन्ह्यात, तर दुचाकी चोरीच्‍या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या दोन सराईतांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रहिमतपूर पोलिस ठाण्‍यात एक दरोड्याचा गुन्‍हा दाखल असून, त्‍यातील संशयित दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. संशयित वडूज येथील इंदिरानगर भागात असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्‍यास ताब्‍यात घेतले. मुंबई आणि पुणे येथून चोरलेल्‍या दुचाक्‍या दोघे जण तांबवे (ता. कराड) परिसरात विकत असल्‍याची माहिती गुन्हे शाखेच्‍या पथकास मिळाली होती. यानुसार त्‍यांनी तांबवे येथे कारवाई करत दोघांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्‍याकडून चोरीतील अडीच लाख रुपये किमतीच्या चार दुचाक्‍या जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत.

या कारवाईत सहा‍यक निरीक्षक आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार अतिश घाडगे, साबीर मुल्‍ला, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मंगेश महाडिक, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, शिवाजी भिसे हे सहभागी झाले. कारवाईत सहभागी झालेल्‍यांचे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.