हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हल्ली अनेकांमध्ये गेम खेळण्याची क्रेझ असल्याचे पाहायला मिळते आहे. सतत मोबाईल अथवा लॅपटॉपमध्ये गेम खेळत बसणारे अनेकजण पाहायला मिळतात. गेमसाठी वाटेल ते करणारे अनेकजण आहेत मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने चक्क त्याच्या हनीमूनसाठी जमवलेले सारे पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत. थोडेथोडके नव्हे तर जवळपास ६ लाख रुपये या व्यक्तीने खर्च केले आहे. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार ही माहिती एका रेडिट युजरने शेअर केली आहे.
रेडिटवर R/relationship_advice subreddit वर बोलताना या महिलेने तिची व्यथा मांडली. तिने अशी माहिती दिली आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. जानेवारीपासून या जोडप्याने दर महिन्याला पैसे साठवण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत जवळपास दोघांनी ८०००डॉलर वाचवले होते. याचदरम्यान तिच्या होणाऱ्या नवऱ्याने गेमिंग पीसी खरेदी करण्याबाबत तिला विचारले. तेव्हा तिने त्याला मनाई केली होती. तिने पुढे असं लिहिलं आहे की, आठवड्याने तो पीसी घेऊन आला. त्याकरता लागणारे टेबल-खुर्ची देखील घेऊन आला. जेव्हा त्याला विचारलं की, एवढे पैसे कुठून आले तर त्याने घाबरत घाबरत घडला प्रकार सांगितला.
तिच्या या पोस्टवर आतापर्यंत ९ हजार कमेंट्स आल्या आहेत. तिची ही पोस्ट रेडिटवर खूप व्हायरल झाली आहे. तिने या पोस्टमध्ये त्याच्या गेम खेळण्याबाबत तक्रार देखील केली आहे. तसंच त्याचा पीसी जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलीला अशी भीती आहे की, तो गेमिंगपायी हातची नोकरी देखील घालवून बसेल. या महिलेने केलेल्या पोस्टनुसार तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या जवळच्या मित्राने गेमिंग कम्प्यूटर घेतल्यानंतर त्याचीही हा पीसी घेण्याची इच्छा तीव्र झाली आणि त्याने हनीमूनसाठी जमवलेला सर्व पैसा खर्च केला. दरम्यान तिच्या होणाऱ्या नवऱ्याने हा सर्व पैसा पुन्हा कमावण्याचे आश्वासन त्याने तिला दिले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.