प्रेयसीचा विरह सहन न झाल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हमीरपूर : वृत्तसंस्था – आपल्या प्रेयसीचे लग्न झाल्याचे समजताच प्रियकराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत तरुणाने आधी शेतात जाऊन गळफास लावलेला सेल्फी काढून आपल्या कुटुंबाला व मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आत्महत्या केली. मुलाच्या गळ्यातला फास पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली असता रात्री उशीरा एका शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता.

काय आहे प्रकरण
हि घटना उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या जखेडी गावामध्ये घडली आहे. या गावातील मृत तरुण लक्ष्मी प्रसाद प्रजापती याचे गावातील एका मुलीवर प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते पण दोन्ही कुटुंबाने या लग्नाला विरोध केला. यामुळे मृत तरुण अस्वस्थ झाला. त्यानंतर तो राजस्थानातील अलवर याठिकाणी एका कंपनीत काम करण्यासाठी निघून गेला. त्यानंतर शुक्रवारी मृत तरुण लक्ष्मी प्रसाद प्रजापती राजस्थानावरून आपल्या गावी बसने परत येत असताना त्याला प्रेयसीचे लग्न झाल्याची बातमी समजली. त्याच्या प्रयसीचे लग्न झाले हे त्याला सहन नाही झाले. त्यानंतर तो ललपूरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वासा याठिकाणी बसमधून खाली उतरला यानंतर त्याने बाजूच्याच एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याअगोदर त्याने गळफास लावल्याचा फोटो काढून आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवला त्यानंतर त्याने आपली जीवनयात्रा संपवली. हा फोटो मिळाल्यानंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी त्याला सर्वत्र शोधले पण त्याचा काही पत्ता लागला नाही. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर रात्री उशिरा त्या तरुणाचा मृतदेह एका शेतात झाडाला लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला. यानंतर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.