औरंगाबाद हादरलं!! प्रियकराकडून प्रेयसीचा निर्घृण खून; हत्येची माहिती व्हॉट्सअपवर

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. अंकिता श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव असून सौरभ लाखे असं आरोपीचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सौरभ लाखे हा विवाहित असूनही त्याचे अंकिता श्रीवास्तव सोबत विवाहबाह्य संबंध होते. तो औरंगाबादच्या शिऊर गावात पत्रकार म्हणून काम करायचा. तर मृत महिला अंकिता ही जालन्यातून एमपीएससी- युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी औरंगाबाद शहरात आली होती. याच काळात दोघांचे परस्परांवर प्रेम जडले. सौरभ हा तीन दिवसांपूर्वी अंकिताच्या रूमवर आला होता तेव्हा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर सौरभने तिचा खून केल्याचा संशय आहे.

आज सकाळी आरोपी प्रियकर रुम उघडून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावू लागला, मात्र दरवाज्या उघडा असल्यामुळे घरातून दुर्गंधी येऊ लागली. यानंतर शेजाऱ्यांनी खोलीत जाऊन बघितलं असता त्यांना रक्ताचा सडा पाहायला मिळाला. त्यामुळे नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. एकीकडे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले तर दुसरीकडे आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आपण हत्या केली असून, मृतदेह गाडीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. याचवेळी त्याने मी खून केला असल्याची माहिती पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर टाकली. दरम्यान, प्रेयसीचा अशा प्रकारे निर्घृण खून केल्याच्या या घटनेमुळे औरंगाबादेत खळबळ माजली आहे.