Tuesday, June 6, 2023

BPCL ने लॉन्च केली आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉट उर्जा, ग्राहकांना मिळतील ‘या’ सुविधा

नवी दिल्ली । देशातील प्रमुख आणि आघाडीची पेट्रोलियम कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. म्हणजेच, बीपीसीएल (Bharat Petroleum Corporation Limited) ने ग्राहकांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न / समस्या लवकर सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित चॅटबॉट ‘उर्जा’ विकसित केले आहे. देशातील ऑईल अँड गॅस इंडस्ट्रीतील ही पहिलीच सुविधा आहे.

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, “चॅटबॉट AI आणि NLP (नॅच्युरल लँग्वेज प्रोसेसिंग) क्षमतेसह एक प्रकारचा वर्चुअल असिस्टंट आहे. उर्जा चॅटबॉटला 600 पेक्षा जास्त वापराच्या प्रकरणांमध्ये प्रशिक्षण दिले जाते.वर्चुअल असिस्टंट LPG बुकिंग, किंमत आणि पेमेंट स्टेटस, बुक केलेल्या LPG सिलेंडरची पुरवठा स्थिती यासारख्या सेवा पुरवतात.

या सुविधा चॅटबॉटद्वारे उपलब्ध होतील
उर्जा चॅटबॉट युझर्सना LPG सिलेंडर वितरक बदलणे, मोबाईल क्रमांक अपडेट करणे, भारत गॅस वितरकांकडून सेवांची विनंती करणे आणि डबल बाटली कनेक्शनची मागणी करणे (सिंगल बाटली कनेक्शन ग्राहकांसाठी) सुलभ करते.

चॅटबॉटद्वारे जवळच्या पेट्रोल पंपाचा पत्ता
या चॅटबॉटचा वापर जवळच्या कोणत्याही पेट्रोल पंपाला शोधण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. तसेच या सुविधेद्वारे घरीच इंधन मागवता येते. BPCL ने सांगितले की, उर्जा आता कंपनीच्या वेबसाइटवर बी 2 बी आणि बी 2 सी वरील कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उपलब्ध आहे.