‘शिर्डीतील आंदोलन मागे घ्या! अन्यथा शेंदूर फासू’; तृप्ती देसाईंना ब्राह्मण महासंघाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिर्डी । साईबाबा मंदिर संस्थानकडून भाविकांना भारतीय पोशाखातच दर्शाला येण्याची विनंती करणाऱ्या बोर्डवरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आज शिर्डीत दाखल होत, मंदिर संस्थानकडून लावण्यात आलेल्या बोर्ड हटवण्याचा इशारा दिला आहे. तर तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये येऊ द्या, त्यांना शेंदूर लावून भगवी शाल द्यायची आहे, अशी अजब मागणी ब्राह्मण महासंघाच्या (Brahmin mahasangha) महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवेशबंदी करण्यात आली असूनही त्यांनी शिर्डीत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. अशावेळी ‘त्यांना अटक करु नका, शिर्डीमध्ये येऊ द्या. शेंदूर हा दगडालाही देव बनवतो. त्याला अनुसरुनच या विकृतीची पापे नष्ट व्हावी म्हणून, देसाई यांना शेंदूर लावून भगवी शॉल देऊ इच्छित आहोत’, अशी मागणी ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आली आहे. तसं विनंती पत्रच शिर्डी पोलिसांना देण्यात आलं आहे.

ब्राह्मण महासंघाला पोलिसांची नोटीस
तृप्ती देसाई यांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन ब्राह्मण महासंघही आक्रमक झाला आहे. आज शिर्डीमध्ये तृप्ती देसाईंना विरोध करण्यासाठी ब्राह्मण महासंघ आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना नोटीस बजावली आहे.

‘शिर्डीतील ‘तो’ बोर्ड काढणारच’; तृप्ती देसाईंचा निर्धा
शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोशाखात येण्याची विनंती केली आहे. तसा फलक शिर्डी संस्थानकडून लावण्यात आला आहे. याला भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. आज शिर्डीमध्ये जात मंदिर संस्थानने लावलेला ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणारच असा निर्धारच देसाई यांनी पुण्यात बोलून दाखवला आहे.

तृप्ती देसाई यांच्या इशाऱ्यानंतर शिर्डीमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई यांना 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. असं असलं तरीही आज शिर्डीमध्ये जाऊन ड्रेसकोड सक्तीचा बोर्ड काढणार असल्याचा दावा देसाई यांच्याकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिर्डीमध्ये जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment