Brain Cancer | मोबाईल फोन हा आता आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग बनलेला आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण मोबाईलचा वापर करतात. क्षणोक्षणाला आपल्याला मोबाईलची गरज पडते. त्यामुळे सगळेजण केव्हाही पाहिले तरी मोबाईलच घेऊन बसलेले असतात. बसमध्ये, बस स्थानकावर कुठेही पाहिले तरी, लोक मोबाईल घेऊनच असतात. परंतु आता एक असे संशोधन समोर आले आहे. ज्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तो म्हणजे मोबाईलच्या अतिवापरामुळे आता मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळे आरोग्य तज्ञांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोबाईलच्या आपल्या जीवनावर किती दुष्परिणाम होतात. हे आपण वारंवार ऐकतच असतो आता जागतिक आरोग्य संघटनेने एका अभ्यासातून याबाबत एक मोठी गोष्ट समोर आणलेली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने एक अभ्यासात अभ्यास केला आणि त्या अभ्यासात असे सांगितले आहे की, मेंदूच्या कर्करोग (Brain Cancer) आणि मोबाईल फोनचा सध्या तरी थेट संबंध येत नाही. परंतु या अभ्यासामध्ये विविध गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यानुसार असे समोर आले आहे की, सध्या वायरलेस तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण मेंदूच्या कर्करोगांच्या प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतु कर्करोगासारखा परिणाम अशा लोकांना होऊ शकतो. जे एका दशकापेक्षा जास्त काळ मोबाईल फोन कॉल करतात. आणि मोबाईल फोन वापरतात. यामध्ये 1994 ते 1922 यादरम्यान 63 अभ्यासाचा समावेश केला होता.
जागतिक आरोग्य संघटनेने जो अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये मोबाईल फोन, टीव्ही, मॉनिटर, रेडियो फ्रिक्वेन्सी परिणामांचे मूल्यमापन दाखल केले. यावेळी असे म्हणतात की, कोणत्याही प्रमुख प्रश्नांमध्ये सध्या तरी जोखीम वाढलेली नाही. यात प्रौढ तसेच मुलांमध्ये मेंदूचा कर्करोग, लाळ ग्रंथी, लुकेमिया यांच्या कर्करोगात सह मोबाईल फोन वापर यांचे मूल्यांकन केले गेले.
दुष्परिणामांचे पुरावे नाही | Brain Cancer
मोबाईल फोनमुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. याची तपासणी संशोधकांनी केलेली आहे की, मोबाईल मधून उत्सर्जित होणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन हे कर्करोगास कारणीभूत ठरतात. परंतु यामध्ये आधी संशोधनाची गरज आहे. परंतु मोबाईल फोन वापरणाऱ्यांना मेंदूच्या कर्करोगाचा जास्त धोका नसतो. यामध्ये कर्करोगाच्या इतर प्रकार स्वतंत्रपणे नोंदवले जातात. मोबाईल फोन आपल्याला रेडिएशनचे दुष्परिणामांचे ठोस पुरावे नाही. परंतु यासाठी आणखी संशोधन करणे खूप गरजेचे असते.
मोबाईल फोन सुरक्षितपणे कसा वापरायचा ?
- तुमचा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा.
- फोनवर बोलताना तुमचा फोन कानाजवळ धरण्याऐवजी स्पीकर हेडसेट किंवा हँड्स वापरा.
- शक्यतो कॉल करण्याऐवजी मेसेज किंवा whatsapp करा.
- नेहमी असाच मोबाईल फोन खरेदी करा ज्यातून कमीत कमी रेडिएशन मिळतात.
- झोपताना फोन तुमच्या शरीरापासून दूर ठेवा.