हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या सगळं जग कुठल्या गोष्टीची आतुरतेनं वाट पहात असेल, तर ती गोष्ट म्हणजे कोरोनावरची लस. पण जर कुणी म्हटलं, की कोरोनाची लस घेतली तर तुम्ही मगर व्हाल तर? किंवा कुणी म्हटलं, की कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांना दाढी येईल, तर? अर्थात, आपला जरी यावर विश्वास बसला नाही, तरी ब्राझीलचे पंतप्रधान जेअर बोलसोनारो यांचा मात्र यावर दृढ विश्वास बसला आहे. यासंदर्भात त्यांनी जाहीर वक्तव्य देखील केलं आहे.
O presidente Jair Bolsonaro revela um dos seus medos sobre a vacina contra Covid-19: transformar seres humanos em jacarés pic.twitter.com/5LCHfCnlYV
— Samuel Pancher (@SamPancher) December 17, 2020
खरं तर ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ब्राझीलला सध्या कोरोना लशीची अत्यंत गरज आहे. अशातच आता ब्राझीलमध्ये लशीकरणाची सुरुवात करताना ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सेनारो यांनी कोरोना लशीविषयी अजब वक्तव्य केलं आहे. जर महिलांनी कोरोनाची लस घेतली तर महिलांना दाढी येऊ शकते किंवा माणसाचे रूपांतर मगरीत होऊ शकते, असं वक्तव्य जैर बोल्सेनारो यांनी केलंआहे. बुधवारी ब्राझीलमध्ये लशीविषयी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
फायझर कंपनीने आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की या लसीचे जर दुष्परिणाम झाले त्याला आम्ही जबाबदार नाही. त्यामुळे एखाद्याने लस घेतली तर त्याचे रूपांतर मगरीत होऊ शकते किंवा महिलांना दाढी येऊ शकते. काहीही दुष्परिणाम झाला तरी या कंपन्या त्याला जबाबदार राहणार नाहीत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’