Breaking | पुण्यातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

0
55
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा परिसरात सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत ढासळून झालेल्या अपघात बांधकामावर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ठार झाले आहेत. मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. तर या घटनेस जबाबदार असणारे बिल्डर जगदिश अगरवाल, पंकज व्होरा यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी घटना स्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखाची मदत जाहीर करण्यात आली. तर मुख्यमंत्र्यांनी या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल असे जाहीर केले.

तर मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी घटना स्थळी भेट देऊन संबंधित बिल्डरवर कायदेशीर कारवाही करण्याची मागणी केली. त्यानंतर वरील दोन बिल्डरवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here