हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांनी भाजपला मतदान केले नाही. ते भाजपला पराभूत करु शकणार्या पक्षांना मतदान करतात. निवडणुकांच्या वेळी कोणाला पराभूत करायचे हे अल्पसंख्याक ठरवतात, राज्यात बदलेली सत्तासमीकरण हेच दर्शवितात, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची बैठक मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. त्यावेळी शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
NCP Chief Sharad Pawar at NCP minority cell meeting: During Maharashtra elections, Muslims didn’t vote for BJP. They vote for parties which can defeat BJP. During elections, the minorities decide whom to defeat. In the state,the change of guard which we are seeing is due to that. pic.twitter.com/9EyhLR7tvy
— ANI (@ANI) January 23, 2020
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, अर्थमंत्री अजित पवार, मंत्री नवाब मलिक ,
खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.