बांगलादेशी समजून पाडली गरीब भारतीयांची कच्ची घरं; कर्नाटकातील धक्कादायक प्रकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी वाद-विवाद, चर्चा, आंदोलने, मोर्चे निघाल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतील मुस्लिमेतर अल्पसंख्यांक लोकांना योग्य अटींच्या पुर्ततेवर भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्याने केलेली असताना यातून मुस्लिमांना वगळल्याचा राग अनेक लोकांमध्ये दिसून आला. भारतातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी समाजातील लोकही या कायद्यामुळे आपली ओळख गमावतील का अशी भीती निर्माण झाली.

निर्वासितांसाठी डिटेन्शन कॅम्प उभारण्याची तयारी अनेक राज्यांत सुरु असल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. त्रिपुरा आणि बेंगलोरमधील महापालिकांनी फतवे काढून बांगलादेशी असल्याच्या संशयाने गरीब लोकांच्या वसाहती उध्वस्त केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे.

आम्ही गरीब आहोत, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आम्ही भारतीय आहोत. मोठी आणि पक्की घरं बांधण्याइतके पैसेही आमच्याकडे नाहीत. असं असताना आमच्यावर हा अन्याय का केला जातोय असा संतप्त सवाल त्रिपुरामध्ये घर उध्वस्त झालेल्या मोहम्मद जहांगीर हुसेन यांनी विचारला आहे. कर्नाटकमध्येही अशाच प्रकारे २०० घरं उध्वस्त केली गेली असून याची माहिती दस्तरखुद्द महापौरांनाच नसल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात लक्ष देऊन दोषींवर कारवाई करणार असल्याचं बुऱ्हातचे महापौर एम.गौतम कुमार यांनी सांगितलं आहे.

 

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती

वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या एका मेसेजवर त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करेन – धनंजय मुंडे

न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जखमी शिखर धवनच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी

Leave a Comment