सातारा : वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी सारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सातारा दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी फार कठोर भूमिका घेतली होती. यावर मात्र शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे. वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी साऱखी झाली आहे, अशा शब्दात आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली. तसेच ताठ मानेने सत्ता चालवायची असेल तर शिवसेनेने भाजपसोबत यावे, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. भविष्यमध्ये पुन्हा भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष एकत्र येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना काँग्रेसच्या दबावाला बळी पडत आहे
रामदास आठवले यांनी म्हंटले की, बांगलादेशींना येथून हाकलून लावा अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने राज्यसभेत घेतली होती. पण ठाकरे यांचं सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार काँग्रेसच्या दबावाला बळी पडत आहे.