सत्ता असताना गोट्या खेळत होता का? जलील यांचे पंकजांवर टीकास्त्र

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. मराठवाड्यासाठी औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली. पंकजा मुंडे यांच्या या उपोषणावर औरंगाबादचे खासदार जलील यांनी टीकास्त्र सोडले आहे. सत्ता असताना गोट्या खेळत होता का असा सवाल उपस्थित करत जलील यांनी पंकजांवर निशाणा साधला आहे.

सत्ता गेल्यानंतर ही नौटंकी का सुचते?

पाणी हा गंभीर प्रश्न आहे. मग गेले पाच वर्ष केंद्रासोबत राज्यातही तुमचीच सत्ता होती. तेव्हा गोट्या खेळत होता का? सत्ता गेल्यानंतर ही नौटंकी का सुचते? आम्ही एवढे मूर्ख नाही. जनताही मूर्ख नाही. विरोधी पक्षात असूनही मी हे प्रश्न विचारत आहे. सत्ता असताना काही केलं नाही आणि आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी हा प्रश्न तुमचे समर्थकही विचारतील,’ असं म्हणत जलील यांनी कडाडून टीका केली.