जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये २५ जानेवारी रोजी भाजप वगळता काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये जलसंदमंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीकरत शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

सीएए कायद्यामळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे भारत देशाची फाळणी करायचे षडयंत्र रचत आहेत असं वकव्य दोन्ही मंत्र्यांनी केलेलं आहे. या दोनही मंत्र्यावर भा.द.वि. ५०५ अंतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. जर पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला तर केंद्रीय तपास यंत्रणा एन.आय.ए मार्फत त्यांच्या वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात भाग पाडू असा इशारा सांगली भाजपकडून देण्यात आला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मोदी सरकार देशात हिंसाचार पसरवित आहे; राहुल गांधीचा आरोप

सत्ता असताना गोट्या खेळत होता का? जलील यांचे पंकजांवर टीकास्त्र

Leave a Comment