जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू- भाजप खासदार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शाहीन बागमध्ये जमलेल्या जमावाला देशद्रोही ठरवत, अशा देशद्रोह्यांना गोळी मारायला पाहिजे, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले होते. त्यामुळं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयन्त केला जात आहे. या वक्तव्याचे समर्थन करताना CAA आणि NRCच्या विरोधात शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला एका भाजप खासदाराने लक्ष केलं आहे. शाहीन बागमधील परिस्थितीची तुलना काश्मीरशीसोबत करून दिल्लीच्या मतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदार परवेश वर्माने केलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर टीका करताना परवेश वर्मा म्हणाले की, ”दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया म्हणतात आम्ही शाहीन बाग सोबत आहोत. परंतु, शाहीन बाग हे काश्मीर झाले आहे. काश्मीरमध्ये ज्याप्रमाणे काश्मीर पंडितांच्या बहीणीवर, मुलीवर अत्याचार झाले. त्याच प्रमाणे दिल्लीत परिस्थिती उद्भवेल. भाजप सत्तेत आली नाही तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील, त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. उद्या मोदी किंवा अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत. जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार परवेश वर्मा यांनी केले आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!

बाईट देतो पण बुट घेवू द्या; पंकजांच्या उपोषणात देवेंद्र फडणवीसांना बूट चोरी जाण्याचीच धास्ती

महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..