हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्मला यांनी दिलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे भाषण. तब्बल अडीच तास भाषण दिल्यानंतर त्यांच्या गळ्याला त्रास होत असल्याने त्यांनी आपले बाकीचे भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर मंत्र्यांनी सीतारामन यांना आवाहन करीत अर्थसंकल्प सदनाच्या पटलावर ठेवायला सांगितला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट भाषण केले आहे. यापूर्वी 2003 मध्ये जसवंत सिंग यांनी 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. सकाळी 11 वाजता निर्मला सीतारमण यांचे भाषण सुरू झाले जे अडीच तासापेक्षा जास्त चालले.