मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसीय महाबळेश्वर दौऱ्यावर; कुटुंबासाठी घेतली ३ दिवसांची सुट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आधी शिवसेनेचा भाजपसोबत मुख्यमंत्रीपदावरून वाद, या वादात आरोप-प्रत्यारोपांना समोर जाणे, नंतर भाजपशी युती तुटणे, नवी सत्तासमीकरण जुळवत सत्तेत नव्या सहकाऱ्यांसोबत बसतांना झालेली दमछाक, दरम्यानच्या पत्रकार परिषदा, राज्यातील ओल्या दुष्काळ पाहणीचे दौरे असा प्रवास करत अखेर उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले.

मात्र मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची प्रशासकीय धावपळ सुरु असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. बैठका, उद्धाटन अशा कार्यक्रमातून वेळ काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून ३ दिवसाच्या महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यावर आहेत. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केली आहे.

दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह सभारंभ महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

भीमा-कोरेगाव हल्ला हा तत्कालीन भाजप सरकारचा पूर्वनियोजीत कट- जोगेंद्र कवाडे

‘आजही गोडसे जिवंत’; जामिया गोळीबार प्रकरणी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

हातकणंगले तालुक्यातील माणेवाडी गावामध्ये 35 लोकांना जेवणातून विष बाधा