मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा धोका आता वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७०० पार झालीय. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात कोरोनाचे एकूण १४७ रुग्ण सापडले आहेत.
आज सकाळी कोल्हापुरात २ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोरोना स्थिरावताना दिसतोय. तसेच विदर्भासाठीही कोरोनाचा धोका वाढला आहे. नागपुरात आज सकाळी कोरोनाचे नवे ४ रुग्ण सापडलेत. गोंदियातही एक कोरोना रुग्ण सापडला आहे. कोरोना आता ग्रामीण भागात पोहोचला असल्याने सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती कोरोनारुग्ण आहेत हे पाहण्यासाठी खालील ताजी यादी पहा.
मुंबई ५१
पुणे २०
पिंपरी चिंचवड – १२
सांगली – २३
नवी मुंबई – ५
कल्याण डोंबिवली ५
नागपूर – ९
यवतमाळ – ४
ठाणे – ५
अहमदनगर – ३
सातारा – २
पनवेल – १
उल्हासनगर – १
औरंगाबाद – १
रत्नागिरी – १
वसई विरार – १
कोल्हापूर – २
सिंधुदुर्ग – १
गोंदिया – १
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
सांगलीत एका दिवसात १२ नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २३ वर
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या




