मुंबई प्रतिनिधी | कोरोना विषाणुने राज्यात आता चांगलेच पाय पसरले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांसोबतच ग्रामिण भागातही कोरोनारुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज १ हजार पार गेली आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे १५० नवीन रुग्ण सापडले आहेत. सध्या राज्यातील एकुन कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०१८ झाली आहे. यामध्ये मुंबईत आज ११६ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात १८, अहमदनगरमध्ये ३, बुलढाणा २, ठाणे २, नागपूर ३, सातारा १, औरंगाबाद ३, रत्नागिरी १, सांगली १ असा तपशील आहे. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली.यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018 झाली आहे.यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 7, 2020
दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. देशात सध्या ४३१२ कोरोना रुग्ण आहेत. यातील ३५२ रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर देशात कोरोनामुळे आत्तापर्यंत १२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?
१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे
‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?