नवी दिल्ली | लॉकडाउनमध्ये हातावर पोट भरणाऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून केंद्राने १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या नावाने विशेष पॅकेजची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. या योजेनचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही सीतारामन यांनी सांगितलं.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
अर्थमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले , प्रधानमंत्री गरीब कल्याण अण्णा योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना स्वस्त दरातील धान्य मिळेल. कोरोना विषाणूमुळे लागू केलेल्या लोकडाऊनच्या कुणाही गरिबाला अन्नाची चिंता करण्याची गरज नाही. या योजनेअंतर्गत गरीब लोकांना पुढील ३ महिन्यासाठी ५ किलो गहू, तांदूळ आणि १ किलो डाळीचे मोफत गरिबांना वाटप केलं जाणार आहे.
८.६९ कोटी शेतकर्यांना २ हजार रुपये मिळतील
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ८.६९ कोटी शेतकर्यांना प्रत्येकी २ हजार रुपये सरकार देणार आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात या योजनेची पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.
मनरेगा मजुरांच्या पगारात वाढ
मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचा पगार वाढविण्याच्या निर्णय केंद्रानं घेतला आहे. मजुरांच्या दैनंदिन वेतनात 200 रुपये वाढ करण्यात आली आहे.
तीन कोटी ज्येष्ठ नागरिक, विधवा यांना मदत
ज्येष्ठ नागरिक, विधवांना १ हजार रुपये अतिरिक्त मदत मिळणार आहे. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये देण्यात येईल. याचा फायदा ३ कोटी ज्येष्ठ, विधवा आणि अपंग लोकांना होईल. हे सर्व पैसे डीबीटीमार्फत त्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.
२० कोटी महिलांना जनधन खात्यात दरमहा ५०० रुपये
पंतप्रधान जनधन खातेदार महिलांच्या खात्यात पुढील ३ महिने दरमहा ५०० रुपये ट्रान्सफर केले जातील. याचा फायदा २० कोटी जन धन महिलांना होईल. ही रक्कम डीबीटीमार्फत त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
नोरदारांचा ईपीएफओ सरकार भरणार
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत पुढील तीन महिन्यांपर्यंत संघटित क्षेत्रातील नोकरदारवर्गाचा ईपीएफओ सरकार भरणार. १५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न कमावणाऱ्या १०० कर्मचारी संख्या असणाऱ्या कंपन्यांना याचा लाभ मिळेल.
पीएफ रक्कम काढण्याची अट शिथिल
या व्यतिरिक्त सरकारने पीएफची रक्कम काढण्यासाठी अटी शिथिल केल्या आहेत. कर्मचारी आता त्यांच्या पीएफ खात्यातून ३ महिन्यांचा पगार किंवा ७५ टक्के रक्कम काढू शकतील. याचा फायदा ४.८ कोटी लोकांना होईल अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.
महत्वाच्या घोषणा –
देशातील ८० कोटी जनतेला मिळणार लाभ
८ कोटी बीपीएल कुटुंबियांना पुढील ३ महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार
प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेअंतर्गत घोषणा
आरोग्य क्षेत्रातील लोकांसाठी ५० लाखांचा विमा
आशा वर्जर, स्वच्छता कर्मचारी यांनाही मिळणार विमाचा लाभ
प्रधानमंत्री अन्न योजना
गरिबाला ५ किलो गहु किंवा तांदुळ मोफत मिळणार
पुढील ३ महिण्यासाठी गहु, तांदुळ मोफत मिळणार
२० महिलांच्या जनधन खात्यांत ५०० रुपये जमा होणार
गरिब वृद्ध, गरिब महिला, दिव्यांगांना यांना अतिरिक्त १००० रुपये मिळणार
एप्रिलमध्ये शेतकर्यांच्या खात्यात २००० रुपये जमा होणार
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”
धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या