हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : फ्लिपकार्ट, झोमॅटो इत्यादी सेवांच्या माध्यमातून घरपोच खाण्याच्या तसेच इतर वस्तू मिळतात. पण कधी दारू घरपोच मिळेल असे तुम्हाला वाटले होते का? नाही ना. पण आता दारू देखील घरपोच मिळणार आहे. पंजाबमध्ये लवकरच खाण्यापिण्याच्या सामानांसोबत दारूही ऑनलाइन मिळणार आहे. तसेच दारूची होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) मिळणार आहे.पंजाब सरकारने या संबंधी योजना आणली आहे. असा प्रयोग या आधी महाराष्ट्रात देखील झाला होता परंतु तो यशस्वी झाला नाही.
शुक्रवारी २०२०-२१ या वर्षासाठी नवीन धोरणाची घोषणा करण्यात आली. या धोरणात राज्य सरकारने मोहालीमध्ये ट्रायल म्हणून एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात दारूची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. ही योजना राबवताना शहरातील सर्व परवानाधारक दारू विक्रेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. या चर्चेनंतर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जर दुकानदारांनी यावर आक्षेप घेतला तर ही योजना बंद करण्यात येईल, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाब सरकारने हा प्रस्ताव दारू विक्रेत्यांसमोर ठेवला आहे. ऑनलाइन डिलिव्हरी व्यवस्था लागू करण्यासाठी सरकारपुढे अनेक अडचणी आहेत.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर WhatsApp करा अाणि लिहा ‘HelloJob’