टीम हॅलो महाराष्ट्र । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ”पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका. निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ. मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा”.खोपकरांच्या या आव्हानानंतर शिवसेनेने बाजूला ठेवलेला हिंदुत्वाचा मुद्दा आता मनसे पळवणार आहे याचे संकेत त्यांच्या ट्विटमधून मिळत आहेत.
पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली सपक महाखिचडी..
पण सच्च्या कार्यकर्त्यांनो,बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका…
निर्लज्जपणे असाच सुरु राहील सत्तेचा खेळ
मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ
बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) January 22, 2020
दरम्यान उद्याच्या अधिवेशनात मनसे जुना झेंडा रद्द करून नवा झेंडा आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नव्य झेंड्यातून निळा, हिरवा आणि पाढरा रंग काढून टाकण्यात आला असून नव्या झेंड्यात फक्त भगवा रंगच असणार आहे. मनसेने आपल्या नव्या प्रस्तावित झेंड्यावर शिवमुद्रा असेल हे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालं. त्यानंतर त्यांवर अनेकांनी आक्षेपही नोंदवले. मात्र, मनसेने निवडणूक आयोगाकडे दोन प्रकारचे झेंडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांपैकी एक शिवमुद्रा असलेला झेंडा आहे. तर, दुसऱ्या झेंड्यावर मनसेचे निवडणूक चिन्ह असलेले इंजिन दाखवण्यात आले आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
असा असायचा स्वातंत्र्यपूर्व भारताचा अर्थसंकल्प!
बांगलादेशी समजून पाडली गरीब भारतीयांची कच्ची घरं; कर्नाटकातील धक्कादायक प्रकार
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय अनिवार्य होणार; मंत्री सुभाष देसाईंची माहिती