पुणे प्रतिनिधी | मयूर डुमणे
ऍड. रावसाहेब शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित सत्कार सोहळ्यामध्ये शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर, खासदार श्रीनिवास पाटील, साहित्यिक प्रशांत गडाख आणि प्रा. मिलींद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. पुण्यातील एस. एम.जोशी फाऊंडेशनच्या वास्तूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, डी.वाय.पाटील विद्यापीठाचे समन्वयक सचिन ईटकर आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी रावसाहेब शिंदेंच्या आठवणींना उजाळा दिला. श्रीनिवास पाटलांनी रावसाहेब शिंदेंच्या जीवनातील किस्से सांगताना त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाची, त्यांच्या मनमिळावू स्वभावाची आणि धोरणीपणाची उदाहरणं दिली. रयत शिक्षण संस्थेतील महत्वाचं पद सांभाळताना रावसाहेब शिंदेंनी केलेला खटाटोपही श्रीनिवास पाटलांनी उलगडून सांगितला.
पहा याच कार्यक्रमातील झकास व्हिडियो – https://youtu.be/PASStotlJ7Y
सोशल मीडियाच्या जमान्यात मोजकंच आणि परिणामकारक बोलावं असं म्हणत मिश्कीलपणा दाखवत श्रोत्यांचं मनोरंजनही श्रीनिवास पाटलांनी केलं. वाट चुकलेली असताना पावसात योग्य जोडीदार भेटणं गरजेचं असतं असं म्हणत त्यांनी साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी झालेल्या शरद पवारांच्या सभेचा नकळत उल्लेख केला. ‘यावेळी मी वाट चुकलेला नव्हतो, पण आपल्या जोडीदाराने मागे पाहिलं तर त्याला साथ देणारं कुणीतरी हवं म्हणून मी तिथं उभं राहिलो’ अशी स्पष्टोक्ती श्रीनिवास पाटलांनी यावेळी दिली. माणसाने स्पर्धा करावी पण ती मोकळी आणि निरोगी असावी असा मौलिक संदेश द्यायलाही श्रीनिवास पाटील विसरले नाहीत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”
हे पण वाचा-
शरद पवारांचा शहरी नक्षलवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न – विनोद तावडे
जगातील सर्वात मोठी लोकशाही पंतप्रधान मोदी नष्ट करत आहेत; साप्ताहिक द इकॉनॉमिस्टची जहरी टीका
बंद यशस्वी झालाय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांकडून ४ वाजता महाराष्ट्र बंद मागे