एकतर्फी प्रेमातून त्याने चक्क माॅडेलला ठेवले ओलीस, पोलीसांवर केला गोळीबार

thumbnail 1531500760671
thumbnail 1531500760671

भोपाळ | एका मॉडेलच्या घरात शिरुन तिला दिवसभर ओलिस ठेवण्याचा प्रकार मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात आज घडला. मॉडेल राहत असलेल्या घरात एक तरुण सकाळी नाट्यमयरित्या शिरला आणि त्याने चक्क पोलीसांना न जुमानता त्या माॅडेलला दिवसभर कैद करुन ठेवले. प्रसंगी त्याने फ्लॅटच्या गॅलरीतून गोळीबारही केला. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

हाती आलेल्या माहितीनुसार, भोपाळ शहरातील एका मॉडेलच्या घरी सकाळी माथेफिरू शिरला. त्याने घराची दारे खिडक्या लावून घेतली आणि मॉडेलला मारहान सुरु केली. मुलीचा आरडा ओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी पोलीसांना फोन लावला. पोलीस अपार्टमेंटखाली आल्यावर त्या माथेफीरुने फ्लॅटच्या गॅलरीतून पोलिसांवरही गोळीबार केला. पोलिसांनी अपार्टमेंटला चौहुबाजूने घेरले. काहीवेळासाठी अपार्टमेंटला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान या माथेफिरूने फ्लॅटमधून एक व्हिडिओ शुट केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित केला. मॉडेलची आणि त्याची मुंबईमधे ओळख झाल्याचे आणि मुंबईत दोघंही सोबत माँडेलिंग करत असल्याचे त्याने व्हिडिओमधून सांगीतले. मुंबईत असताना दोघांत घनिष्ठ संबंध होते मात्र पुढे मॉडेलने त्याला दगा दिल्याचंही त्याने व्हिडिओत सांगितलं. नंतर कॅमेऱ्यात रक्ताचे डाग दाखवून ती स्वत:च्या चुकांचे परिणाम भोगत असल्याचे तो माॅडेलला उद्देशून व्हिडिओत बोलत होता. हे सर्व प्रकरण एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला लाजवेल असेच चालू होते. आता पुढे काय होतंय अशी सर्वांनाच काळजी लागून राहीली होती. मात्र पोलिसांच्या हालचालींना यश आले आणि मोठा अनर्थ टळला. पोलीसांनी त्या तरुणाशी फोनवर संवाद साधला आणि त्याला गोड बोलून त्या तरुणीची सुटका करण्यास तयार केले. अखेर ७ वाजून ३५ मिनिटांनी या नाट्यास पूर्णविराम मिळाला.