सोलापूर | रमाई आंबेडकर नगर, आंबेडकर उद्यान, सोलापूर येथील रहिवासी सुनिल मैंदर्गीकर हे सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत.त्यांना मिळणाऱ्या कमी पगारामुळे घरचे उदारनिर्वाह होत नाही म्हणुन नोकरी संपल्यावर ते रिक्षा चालवतात. सुनील मैंदर्गीकर रिक्षा चालवत असताना आपल्या रिक्षातील प्रवासी ने विसरून गेलेले तब्बल 50 लाख रूपयांचा चेक, लॅपटाॅप, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू स्वतः जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांचा स्वाधीन केले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे पोलिस निरिक्षक केडगे यांनी सुनील मैंदर्गीकरांचा यथोचित सन्मान केला.
काही रूपयांसाठी समाजात भांडणे लागल्याचे आपण पाहिले आहे.पण चक्क ५० लाख रूपायाचे चेक, लॅपटाॅप, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू सापडून ही परत करण्याचे औदार्य सोलापूरातील रिक्षाचालक सुनील मैंदर्गीकर यांनी दाखवले आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या रिक्षाचालकाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.