आरोग्यमंत्रा |
भारतामध्ये चहा हे पेय मोठ्या प्रमाणात पिले जाते.बऱ्याच लोकांना तर चहा पिताना वेळेचेही भान राहत नाही, कोणत्याही वेळी लोक चहा पिण्यास तयार असतात. पण हा चहा पीत असताना आपण कोणत्या भांड्याचा वापर करतो हे पाहणे गरजेचे आहे.
टपरीवर,अन्य समारंभात तसेच रेल्वे मध्ये डिस्पोझेबल मध्ये चहा,कॉफी तसेच सूप दिले जाते. जेणेकरून ते वापरून फेकून देता येईल. मात्र हे ग्लास आपल्या आरोग्यासाठी घातक आहेत.डिस्पोझिबल ग्लासेसमध्ये बोट फिरवून पहा, आपल्याला बोट थोडं गुळगुळीत वाटेल. हे काय आहे? तर हे ग्लास आपसात जळू नये म्हणून या ग्लासला मेणाचा पातळ थर लावण्यात येतो.
ग्लासमध्ये गरम पदार्थ टाकल्यावर हे मेण विरघळून जाते.मेणाचा थर पातळ असल्यामुळे त्याचा स्वाद येत नसला तरी हे मेण आपल्या पोटात जाते, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो. त्यामुळे डिस्पोझेबलमध्ये गारम पदार्थांचे सेवन टाळावे.
इतर महत्वाचे –