चामोर्शी तालूक्यात वनविभागाच्या वतीने वनवणव्यावर व्यापक जनजागृती

Untitled design T.
Untitled design T.

गडचिरोली प्रतिनिधी / आष्टी- वनविभाग आलापल्ली वनपरिक्षेत्र चामोशी,घोट, मार्कडा कन्सोंबा येथे वनविभागाचे वतीने वनवणवा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा अंतर्गत गावागावात जनजागृती रॅली व कलापथकाद्वारे वनवणवा न लावण्या बद्दल नागरिकांत व्यापक जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7 वाजता चामोर्शी येथे सुरु करुन गौरीपूर,घोट,वरुर,मार्कडा कन्सोबा,आष्टी या गावात परिसरात वनवणवा न लावण्या बदल व पर्यावरण व जगंलाचे रक्षक करण्याबाबत मागदर्शन करण्यात आले. जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी गडचिरोलीचे विभागीय वन अधिकारी योजना दक्षता एस.एल. बिलौरिकर, सिदेश सावर्डेकर भा.व.से.भामरागड ,सहाय्यक वनसरक्षक एच.जी.मडावी, आदी मान्यवर उपस्थीत होते,या प्रसंगी विविध शालेय विदयार्थी गावकरी व वन विभागाचे कर्मचारी मोठया सख्येने उपस्थीत होते.

इतर महत्वाचे –

उमेदवारी अर्ज छाननीत एक अर्ज अवैध तर २० अर्ज ठरले वैध

स्वीप मोहिम बनली लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालूकाक्यात वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी …