७/१२ च्या उताऱ्यावरून नाव कमी झाल्याचे समजताच शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुमरे


सातबारा उताऱ्यावरील नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात असलेल्या शेतकऱ्याचा तलाठी कार्यालयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 24 जुलै रोजी दुपारी घडली. पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी मुंजाभाऊ दादाराव चाळक ( वय ५५) हे विमा भरण्यासाठी मंगळवारी पाथरी येथे आले होते.

तुरा येथील गट क्रं . 131 मधील मालकीची सातबारा आणण्यासाठी सदरील शेतकरी सज्जाचे तलाठी यांच्या पाथरी येथील खाजगी कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांना तलाठी यांनी तुमचे नाव सातबार्यावर नसल्याचे सांगितले ,यानंतर त्यांनी पाथरी तहसीलदार यांच्याकडे सातबारा उतारा नाव कमी झाल्याची तोंडी तक्रार केल्याची माहीती आहे .

तहसीलदार यांच्या भेटीनंतर तलाठी यांच्या खाजगी कार्यालयात मुंजाभाऊ चाळक गेले होते . यावेळी आता पिक विमा कसा भरणार या विंवचनेत असणाऱ्या मुंजाभाऊ यांना तीव्र ऱ्हदयविकाराचा झटका आला यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय . पाथरी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी सदरील शेतकऱ्यास मृत घोषीत केल आहे . दरम्यान मृत शेतकरी यांचे नातेवाईक व तुरा येथील शेतकरी पाथरी पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले होते .

Leave a Comment