लातूर प्रतिनिधी |लातूर शहरातील बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. प्लॅटफॉर्म नजीक थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत
अज्ञात व्यक्तीने बसमधून गोळीबार केल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. त्यामुळे तो किरकोळ जखमी झाला. पंढरपूर-हदगाव हि नांदेडमार्गे जाणारी बस रात्री ११.३० च्या दरम्यान लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झाली होती. चालक- वाहक हे चहा पाण्यासाठी उतरले असता अचानक बसमधून अज्ञात हल्लेखोर प्रवाशाने गोळीबार केला.
नवऱ्यानेच लावून दिले बायकोचे तीच्या प्रियकरासोबत लग्न
खिडकीमधून बाहेर उभ्या असणाऱ्या एका ठराविक व्यक्तीला मारण्याच्या उद्देशाने त्याने हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हल्लेखोर हा लातूरमध्ये एसटी बसमध्ये बसला होता की कुणाचा पाठलाग करत तेथे आला होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. लातूर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Breaking | बेवफा सनम अलविदा म्हणत तरुणाची आत्महत्या