तिरुनंतपुरम ( केरळ ) | राहुल गांधी यांनी आपल्या केरळमधील वायनाड मतदारसंघातील पूरबाधित नागरिकांना भेट दिली आहे. राहुल गांधी यांनी पुरग्रस्तांच्या मदत केंद्राला भेट देऊन बाधित नागरिकांची विचारपूस केली आहे. राहुल गांधी या ठिकाणी येताच येथील लोकांना त्यांना मोठा प्रतिसाद दिला. त्याच प्रमाणे त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी उसळली होती.
तुमचा खासदार म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो आहे असे राहुल गांधी येथील जनतेला संबोधताना म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे मी येथील मुख्यमंत्र्यांसोबत फोन वरून बोललो आहे. त्यांना मी लवकरात लवकर मदत देण्याची विनंती केली आहे. त्याच प्रमाणे येथील लोकांना मदत देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील बोलणार आहे असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटक पाठोपाठ आता केरळला देखील पूराच्या पाण्याने झपाटून टाकले आहे. गेल्या वर्षी सारखी परिस्थिती यावर्षी देखील निर्माण होते का काय अशी भीती येथील लोकांमध्ये आहे. तसेच येथील सरकार देखील गतवर्षीच्या पूराच्या अनुभवामुळे सतर्क झाले आहे. त्यांनी पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.