जालना प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीनंतर आतासर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. सर्वच पक्षांनी जनसंपर्क, राजकीय दौरे या सारख्या घडामोडींना वेग दिला आहे. तसेच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका केली आहे.
यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’ असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली उडवली.
तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवर दानवेंनी भाष्य केले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पक्षांतर करतांना दिसत आहेत. या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी-कॉंग्रेसमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या भाजप प्रवेशासाठी लाईनीत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा दानवे यांनी केला.